शिरुर पोलीसांनी पकडला ४२ लाखांच्या गुटख्याचा ट्रक (Vdo)

शिरुर,ता.६ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : शिरुर पोलीसांच्या पथकाने पाठलाग करुन सुमारे ४२ लाख रुपये किंमतीच्या गुटख्याचा ट्रक पकडला.हि आतापर्यंतची जिल्हयातील सर्वात मोठी कारवाई आहे.

याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे, पोलीस हवालदार रविंद्र पाटमास, पोलीस नाईक बाळासाहेब हराळ हे (दि.५) रोजी राञी ११ च्या सुमारास गस्त घालत होते.त्याचवेळेस या पथकास एक तंबाखुजन्य पदार्थ असलेला ट्रक चौफुला-शिरुर रस्त्याने शिरुरकडे येत असल्याची माहिती मिळाली.या मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने कर्डेनजीक सापळा रचला.व त्यानुसार या ट्रकवर पाळत ठेवली.त्याचवेळी करड्याजवळ आल्यानंतर चालकास संशय आल्याने ट्रक घेउन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.याचवेळी पाळतीवर असलेल्या पोलीस पथकाने सुमारे दोन किलोमीटर पाठलाग केला व त्यानंतर ट्रक (एम.एच.२१ एक्स.७७४०) हा ताब्यात घेतला.यावेळी ट्रकमध्ये पाहिले असता संपुर्ण ट्रक गुटख्याने भरलेला आढळला.यानंतर  ट्रक ताब्यात घेउन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना कळविण्यात आले. आज मंगळवारी(दि.६) रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांच्या ताब्यात देण्यात आला.हि आतापर्यंतची जिल्ह्यातील मोठी कारवाई असुन  शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त अर्जुन भुजबळ, अन्न व सुरक्षा अधिकारी एम.डी.पाटील, नमुना सहायक राजेश आल्हाट आदींनी ट्रक ताब्यात घेतला.याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि, ट्रक मध्ये १ लाख ४३ हजार रुपयांची तंबाखु, २८ लाख ८० हजार रुपयांचा पान मसाला असा गुटखा मिळुन आला असुन शेरुखान मुस्तफा खान, जाहिद कुतुबुद्दीन शेख या दोघांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

शिरुर पोलीसांनी केलेल्या मोठ्या कारवाई बद्दल या पथकातील अधिकारी व कर्मचा-यांचे  अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या