कराटे स्पर्धेत शिक्रापूर व गणेगावच्या खेळाडूंचे यश

गणेगाव खालसा, ता. 7 फेब्रुवारी 2017 (एन.बी. मुल्ला): राज्यस्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेत शिक्रापूर व गणेगाव खालसा येथील शोतोका^न कराटे अकादमीच्या खेळाडूंनी 14 सुवर्ण, 11 रौप्य तर 15 कास्य पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा चषकही शिक्रापूर येथील शोतोका^न कराटे अकादमीने पटकावला.

बारामती येथे भारत कराटे अकादमीच्या वतीने आयोजित पहील्या राज्यस्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात व वजन गटात काता व कुमेती प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. राज्यभरातून 428 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.या स्पर्धेतील शिक्रापूर व गणेगाव खालसा येथील कराटे अकादमीचे विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : –
कराटे काता प्रकार : नमीरा मुल्ला, कार्तिक सासवडे, आदीत्य बोऱहाडे, ओम पांढरकर, नेहा भांडवलकर, त्रिशाली ढमढेरे, अनन्या चातुर, ओम बांगर, गणेश दाते, किरण दाते(सुवर्ण पदक),, रोहन सासवडे, यशराज इंगळे, ओंकार वाळुंज, वैष्णवी बेंडभर, साहील जाधव, स्नेहल वाळुंज (रौप्य पदक), रोहीत सासवडे, गौरव बोऱहाडे, समर्थ चौधरी, ऋषिकेश दाते, विजया दाते(कास्य पदक). कराटे कुमिते प्रकार : कार्तिक सासवडे, यशराज इंगळे, वैष्णवी बेंडभर, त्रिशाली ढमढेरे (सुवर्ण पदक), नमीरा मुल्ला, रोहन सासवडे, किरण दाते, मोहीनी आघाव, अनन्या चातुर (रौप्य पदक), समिक्षा शेळके, नेहा भांडवलकर, स्नेहल वाळुंज, विजया दाते, ओंकार वाळुंज, चेतन पवार, गणेश दाते, ओम बांगर, ओम पांढरकर, आदीत्य बोऱहाडे (कास्य पदक).

सर्व विजेत्या खेळाडूंना सोमनाथ अभंग यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे कराटे वल्र्ड फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम चव्हाण, संजय शिंदे, शरद फंड, मच्छिंद्र खैरनार, शिरूर बाजार समीतीचे संचालक बाबासाहेब सासवडे, युवा उद्योजक मंगेश सासवडे, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा. एन. बी. मुल्ला यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या