वढुतील गोविंद गोपाळांची समाधी पुर्ववत बसविणार

वढू बुद्रुक, ता. ८ फेब्रुवारी २०१८ (प्रतिनीधी) : येथिल गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधी वरील छत पुर्ववत बसविण्याचा  निर्णय वढू ग्रामस्थांचा व शासकिय आधिका-यांच्या बैठकीत शिरुर येथे घेण्यात आला.

यासंदर्भात शिरुर तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी भाऊसाहेब गलंडे,पोलिस उपविभागिय आधिकारी गणेश मोरे, तहसिलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे व पोलिस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्यासह दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

बैठकी संदर्भातील माहिती देताना तहसिलदार भोसले म्हणाले की  वढू बुदृक येथिल गोविंद गोपाल गायकवाड यांच्या समाधीस्थळावरिल छत पुर्ववत  करावे असे आवाहन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सी.एस.थुल यांनी ग्रामस्थांना केले होते. त्यानुसार तहसिल कार्यालयात दोन्ही समाजातील लोक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.  त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले.त्यात गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळ वरिल छत पुर्ववत बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या