एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा शिरुर तहसिलवर मोर्चा

शिरुर,ता.८ फेब्रुवारी २०१८(सतीश केदारी) : एमपीएससीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी शिरुर तहसिलकार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.


शिरुर शहरात स्पर्धा परीक्षा (एमपीएससी) चा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी आज गुरुवार दि(८) रोजी बाबुरावनगर ते शिरुर तहसिलकार्यालय असा मोर्चा काढला.

राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी.पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक सहायक कक्ष अधिकारी आदी परिक्षा एकञित न घेता स्वतंञपणे घ्याव्यात.एमपीएससी परिक्षा केंद्रावर बायोमेट्रिक हजेरी घ्यावी, परिक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावेत,उत्तरपञिकेसाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा,प्रत्येक पदासाठी प्रतिक्षा यादी लावावी,सी सॅट विषयाच्या पेपरसाठी पाञतेचे निकष केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर करावेत,डमी रॅकेट प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करावी,आयोगाकडुन जे प्रश्न चुकतात किंवा रद्द करण्यात येतात त्याचे स्पष्टीकरण द्यावे व त्याचे गुण त्यांचे गुण तो प्रश्न सोडवणा-या विद्यार्थ्यांना देण्यात यावे,परिक्षेत होणारी मास कॉपी व मास कॉपी करणा-या उमेदवारांना काळया यादीत टाकावे,पोलीस भरतीतील पदांची संख्या वाढवावी,त्वरीत शिक्षक भरती करावी,राज्य व जिल्हा पातळीवरील रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्या, तीस टक्के नोकर भरतीचे धोरण रद्द करावे आदी मागण्यांचे निवेदन या वेळी विद्यार्थ्यांनी  शिरुर चे नायब तहसिलदार ए.के पाटील यांना देण्यात आले.

या वेळी तुषार भोर, सतीश पठारे, अक्षय अवचर, महेश शितोळे, विनोद दरगुडे, अनिल शिंगाडे, रुपेश भोर, तेजस कर्डिले, जगन शिंगाडे, संतोष पडवळ, प्रिती दरगुडे,वृषाली भोसले, श्रद्धा पावडे, प्रियंका  वाखारे, कोमल नवले, गौरी अवचर, कविता वाघमारे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या