...आमदार झाल्या सारखं वाटतयं

शिरुर, ता. ८ फेब्रुवारी २०१८ (सतीश केदारी) : शिरुर-हवेलीतील नेत्यांची होणारी धावपळ अन विविध कार्यक्रमांत उपस्थितीसाठी नेत्यांची लागलेली चढाओढ यामुळे शिरुर-हवेलीत आतापासून आमदारकीची झिंग चढू लागल्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.


शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल जाणवतोय तो शिरुर-हवेलीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीने अन जाहिर भाषणांनी. शिरुर तालुक्यात गेल्या काहि महिन्यात एकमेकांवर आगपाखड करणारे नेते एकञ जेवत असताना सगळ्यांनी पाहिले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील करडे येथे झालेल्या शिरुर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेला विद्यमान आमदारांची उपस्थिती, या कार्यक्रमाला माजी आमदारांची झालेली अनुपस्थिती या परिस्थितीचा फायदा उठवत तालुक्यात भाषण ऐकण्याची उत्सुकता लावणा-या पैलवानांनी आखाड्याच्या फडातच शड्डु ठोकत मीही आमदारकीच्या शर्यतीत असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात अनेक मातब्बर नेते उपस्थित होते.

शिरुर हवेलीत सध्या सर्वात जास्त हवा आहे ती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद यांची. युवकांचा असो कि दु:खद कोणताही प्रसंग कंद हे प्रत्येक कार्यक्रमाला हजर तर राहत आहेतच. परंतु ते मदतही सढळ करतात.जाताना माञ,"माझ्यावर आलीच कधी वेळ तर "आशिर्वाद" द्यायला विसरु नका असेही प्रत्येकाला आवर्जुन  सांगायला विसरत नाहीत.

शिरुर हवेलीत लाखोंचा निधी आणल्याने विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही उद्घाटनाचा धडाका लावला असून जास्तीत विकासकामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

माजी आमदार अशोक पवार हेही या शर्यतीत मागे कसे पडतील ? त्यांची ही प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांत महत्वाच्याच परंतु मोजक्याच ग्रामपंचायतीचीही निवडणूक होणार असुन त्या-त्या भागातील उमेदवार हे देखिल कामाला लागले असून एकच धावपळ चालू आहे.

शिरुर हवेलीतील नेत्यांची प्रत्येक कार्यक्रमाला होणारी उपस्थिती, कार्यक्रमासाठी नेत्यांची धावपळ अन उपस्थितीसाठी लागलेली चढाओढ यामुळे शिरुर हवेलीत कोण होणार शिरुर-हवेलीचा आमदार याच्या चर्चा रंगू लागल्या असून, आतापासुन शिरुर-हवेली तालुक्यात आमदारकीची झिंग चढत असल्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या