पिंपळे जगताप उपबाजार समितीत कांदा पिशवीचे पुजन

पिंपळे जगताप, ता. 9 फेब्रुवारी 2018 (एन. बी. मुल्ला): येथील धर्मवीर संभाजीराजे उपबाजार आवारात कांदा पिशवी व वजनकाटयाचे पुजन ​शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते​ करण्यात आले.


शिरुर बाजार समितीच्या पिंपळे जगताप उप बाजारात जास्तीत जास्त ​शेतकऱ्यांनी कांदा दर मंगळवार व शुक्रवारी विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती शशिकांत दसगुडे​ यांनी सर्व शेतकऱ्यांना केले. या मार्केटमुळे ​शेतकऱ्यांच्या वाहतुक खर्चाची त्याचप्रमाणे वेळेची मोठी बचत होत आहे असे उपसभापती विश्वास ढमढेरे​ यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे ​संचालक शंकर जांभळकर, आबाराजे मांढरे, राहुल गवारे, विकास शिवले, संतोष मोरे, बाबासाहेब सासवडे, प्रा.सतीश कोळपे, विजेंद्र गद्रे, सुदीप गुंदेचा, बंडु जाधव, मंदाकिनी पवार, संभाजी ढमढेरे, ज्ञानेश्वर थेऊरकर, पांडुरंग फराटे,​ आडतदार ​दत्तोबा गावडे, धनंजय भुजबळ, निलेश धुमाळ, व्यापारी बाबुराव बोरा, रमेश ठक्कर, नरसिंग ढोकले, सुदाम कर्पे, मयुर बोरा, विजय गव्हाणे, भाऊसाहेब भोंडे, रामभाऊ हेलावडे, दौलत बोऱ्हाडे, नंदु पाचर्णे, सुभाष वाखारे,​ ​सुनिल वडघुले, योगेश शितोळे, चिंतामण टेमगिरे, सैनिक ढोकले​ आदी उपस्थित होते.

एका दिवसात बाजार मध्ये सुमारे २ हजार कांदापिशवी आवक झालेली होती. व क्विंटलला १ हजार ८०० ते २ हजार ३५० दर निघालेला आहे.​​ सर्व शेतकऱ्यांनी कांदा वाळवुन, निवडुन व वेगवेगळ्या बारदाण्यात मार्केटमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सचिव दिलीप मैड​ यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या