राज्यस्तरीय चर्चासत्रात राज्यभरातील प्राध्यापकांचा सहभाग

तळेगाव ढमढेरे,ता.१० फेब्रुवारी २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : येथील ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी व हिंदी विभागाच्या वतीने ' संस्कृती व समीक्षा : पौर्वात्य व पाश्चिमात्य' या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रास प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे इंग्रजी अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. शरद गाडेकर, डॉ. संगीता घोडके तसेच हिंदी अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. राजेंद्र खैरनार उपस्थित होते. चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. आनंद कुलकर्णी यांनी केले.

आपला देश हा बहुभाषिक आहे.त्याचबरोबर विभिन्न धर्म आणि जाती अस्तित्वात आहेत, प्रत्येकाचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यक वेगळेपण आहे. साहित्यामध्ये नव-नवीन विचार-विमर्श येत आहेत. या सर्वांची समीक्षा काही विशिष्ट मानदंड समोर ठेऊन करणे योग्य ठरणार नाही. बदलत्या काळानुसार संस्कृती आणि समीक्षा यांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. असे मत डॉ. आनंद कुलकर्णी यांनी बीजभाषणात प्रकट केले.

चर्चासत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. सतीश सायकर, प्रा. तानाजी कांबळे, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. गोरख थोरात, डॉ. प्रदीप सरवदे, प्रा. नानासाहेब गोफणे, संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. व्ही. एन. झा तज्ञ मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी या चर्चासत्रासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील यांनी राज्यातील विविध विद्यापीठातुन आलेल्या अभ्यासक व प्राध्यापकांचे स्वागत केले. उपप्राचार्य पराग चौधरी यांनी प्रास्ताविक केले प्रा. विवेक खाबडे यांनी सूत्रसंचालन केले तर हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोहर जमदाडे यांनी आभार मानले. चर्चासत्रास विविध विद्यापीठातील व महाविद्यालयातील पन्नासहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला. चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या