डॉ.अर्चना आंधळे यांना साविञीबाई फुले पुरस्कार प्रदान

पुणे,ता.१० फेब्रुवारी २०१८(रावसाहेब चक्रे) : शाहु फुले आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या वारसा घेऊन स्त्रीयांच्या उद्धारांसाठी आणि स्त्री पुरूष समानतेसाठी कार्य करणा-या वारसा फांउडेशन च्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुरस्कार शिरूरच्या मुलगी वाचवा अभियानाचे प्रणेते डॉ. अर्चना व सतिश आंधळे पाटिल यांना देण्यात आला.


पुणे येथे नेहरू कलादालनात महिला बालकल्याण च्या मुख्य आयुक्त सुवर्णा पवार महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते हा पुरस्कार शिरुर च्या डॉ.आंधळे दांपत्याला सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी कमलताई व्यावहारे माजी.महापौर शैलजाताई मोळक, सामाजिक कार्यकर्त्या व पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकिय आधिकारी कल्पनाताई बळिवंत तसेच वारसा फांउडेशनच्या संस्थापक प्राची दुधाने यावेळी उपस्थित होत्या.यावेळी गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रुणहत्या च्या विरोधात डॉ.आंधळे पाटिल दापंत्यांनी राबविलेल्या अभियानाचे सर्वांनी कौतुक केले.

या वेळी डॉ. आंधळे पाटिल म्हाणाले, हा पुरस्कार नसुन एक जबाबदारी आहे.पुरस्काराने अधिक काम करण्यासाठी आम्हाला एक वेगळी उर्जा मिळाली आहे.यापुढेही मुलगी वाचवा अभियान आधिक जोमाने पुढे नेऊन असे उपस्थितांना या दांपत्यांनी वचन दिले.या कार्यक्रमाला पुणे शहरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या