मलठणला विजेच्या तारांच्या धक्क्याने शेतक-याचा मृत्यु

मलठण,ता.१० फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी): मलठण(ता.शिरुर) येथे तारांना स्पर्श झाल्याने शेतकरयाचा मृत्यु झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, गुरूवार (ता.8) शेतात मक्याच्या शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी पोपट पांडूरंग गायकवाड हे गेले होते. त्याच्या शेतात लोबकळणाऱ्या तारा होत्या. त्यांना या तारेतून विजेचा स्पर्श झाला. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. विरूद्ध दिशेला घासाच्या शेतात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी घरी येऊन पती कुठेही दिसत नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे भाऊ या दिशेने मोबाईलवरून शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना हाताजवळ विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने भाऊ बेशुद्ध अवस्थेत असलेला दिसला.

त्यावेळी त्यांनी खासगी दवाखान्य़ात त्यांना घेऊन गेले. त्यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिरूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलीस स्टेशनला पंचनामा केला असल्याची माहिती मिळाली.या घटनेप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या