मांडवगणमध्ये शेतमजुराची झोपडी आगीत जळून खाक

मांडवगण फराटा, ता.११ फेब्रुवारी २०१८(विठ्ठल गवळी) : मांडवगण फराटा येथील गारमाळ या वस्तीवर एका शेतमजूर कुटुंबाची झोपडी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली असुन संपुर्ण संसारच उघड्यावर आला आहे.

सविस्तर माहिती अशी कि, गारमाळ येथील शेतमजूर सावळाराम यादव धेंडे यांची झोपडी शनिवारी दुपारी बारा वाजन्याच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागून जळून खाक झाली. ही घटना दुपारी घडल्याने उन्हामुळे आगीने काही मिनिटातच झोपडी जळून गेली. या दुर्दैवी घटनेत घरातील धान्य, कपडे, किराणा, भांडी व रोख रक्कम तीन हजार रुपये जळून खाक झाले.

येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वराची यात्रा बुधवार पासून सुरू होत आहे, त्यामुळे या कुटुंबाने यात्रेसाठी नवीन कपडे, किराणा, धान्य खरेदी केलेले होते. लहान मुलांसह सर्वांची कपडे जळाली आहेत. ऐन यात्रेच्या काळात उघड्यावर राहण्याची या कुटुंबावर वेळ आलेली आहे.येथील कामगार तलाठी अमोल कडेकर, कोतवाल भाऊसाहेब खोमणे, यांनी आगीत भस्मसात झालेल्या साहित्याचा पंचनामा केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या