रामलिंग महाराजांच्या पालखीचे प्रस्थान (Video)

शिरुर, ता.१२ फेब्रुवारी २०१८ (सतीश केदारी) : ढोल ताशा अन सुमधुर बॅंड, ढाळघोषांचा गजर अन हर हर महादेव चा नामघोष करत आज शिरूर शहरात शिरूर चे जागृत देवस्थान श्री रामलिंग महाराज पालखीस सुरवात झाली.


शिरूर तालुक्याचे जागरूक देवस्थान रामलिंग महाराज यात्रा महाशिवरात्री च्या दिवशी जुने शिरूर येथील मंदिरात  यात्रा भरवली जाते. त्या अगोदरच्या दिवशी या यात्रेची पालखीचा मान शिरूर शहराला असतो तर यात्रेचा मान शिरूर परिसरातील पंचक्रोशिला असतो. शिरूर शहरांतील शिवसेवा मंदिरात उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या हस्ते महाआरती करून पालखी सोहळ्यास दुपारी सुरुवात झाली.

प्रथेप्रमाणे पालखी सोहळ्याचे स्वागत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे  यांनी पालखीस पुष्पहार घालून केले.यावेळी रामलिंग देवस्थान यांच्या वतीने मानाचा फेटा नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांना बांधण्यात आला. यावेळी देवस्थान अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल,विश्वस्त यांना नगरपरिषद यांचे वतीने मानाचा फेटा बांधण्यात आला व मुख्य पालखी सोहळ्यास शहरातुन सुरवात झाली

या पालखी सोहळ्यासाठी रामलिंग देवस्थान चे खजिनदार व सर्वच पदाधिकारी, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, शिवसेवा ट्रस्ट चे  मनसूख गुगळे, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, संचालक विजेंद्र गद्रे, बंडु जाधव, दिलीप मैड, नगरसेवक रविंद्र  ढोबळे, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, सचिन धाडिवाल, संजय देशमुख, व सर्व नगरसेवक, नगरसेविका, पंचक्रोशि चे तरुण कार्यकर्ते यांसह आबाल वृद्ध यांनी पालखी व रामलिंगचे दर्शन घेतले. या वेळी शिरुर शहरातील भाविक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

आजच्या या पालखी सोहळ्यात संपूर्ण शिरूर शहर भगव्या पताका, भगवे झेंडे, प्रत्येक ठिकाणी स्वागतासाठी कमानी उभारल्या होत्या तर पालखी मिरवणुक मधे प्रत्यक नागरिकांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. यामुळे भगवेमय झाले होते.

शिरूरचे ढोल पथक,डोने ता.मावळ येथील झांज पथक,चाळीसगाव येथील सदगूरू ब्रास बॅड, अमर ब्रासबॅड, हबीब ब्रास बॅड तर आळंदी येथील भजनी मंडळ तर पालखी समोर असलेले भालदार चोपदार,तुलसी घेतेलेले महिला हे आजच्या पालखी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले तर शहरातील कापड बाजार,अखिल रामआळी,दधिची चौक, मारुती आळी, आझाद सोशल क्लब, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभारआळी, अजिंक्य तारा मित्र मंडळ, मुम्बई बाजार, डबेनाल मित्र मंडळ यांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक देखावे व भाविकांचे करिता नाश्ता, शरबत, चहा यांची सोय केली होती तर तर शहरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले. उद्या पहाटे शिरूर शहरातून रामलिंग येथे प्रस्थान होईल रामलिंग मंदिरात पालखी पोहचल्या नंतर महाभिषेक होऊन महाशिवरात्र निमित्त रामलिंग यात्रेस सुरवात होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या