महाशिवराञीनिमित्त वाघाळे येथे विविध कार्यक्रम (Vdo)

वाघाळे, ता.१३ फेब्रुवारी २०१८(विशेष प्रतिनीधी) : भजनात दंग झालेले भाविक तर दुसरीकडे गरीब रुग्णांची सुरु असलेली नेञतपासणी असे आगळे वेगळे चिञ आज (मंगळवार) सकाळपासून वाघाळे गावात पहायला मिळाले.

Image may contain: one or more people, people sitting, table and food
वाघाळे येथे वाघेश्वर जिर्णोद्धार मंडळ व वाघाळे ग्रामस्थांच्या वतीने महाशिवराञीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आज मंगळवार(ता.१३) रोजी सकाळी हरिता सिटिंग सिस्टिम कंपनी रांजणगाव व के.के.आय इन्स्टिट्युट यांच्या वतीने गावातील ज्येष्ठ तसेच गरीब रुग्ण, ग्रामस्थांसाठी नेञतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन सरपंच बबनराव शेळके, माजी चेअरमन राजेंद्र धायबर, माजी सरपंच पप्पु भोसले, शेतकरी संघटनेचे सुहास काटे, ग्रा.पं सदस्य दिलीप थोरात, पप्पुशेठ पवार, म्हस्कु थोरात, विजय शेळके, गोरक्ष गायकवाड आदींच्या उपस्थितीत पार पडले.
दरम्यान सोनेसांगवी व हनुमान भजनी मंडळाने सुमधुर भजने सादर केल्याने वाघेश्वर मंदिरात प्रफुल्लित वातावरण निर्माण झाले.

या वेळी वाघेश्वर जिर्णोद्धार मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सेक्रेटरी संदिप धायबर, उपाध्यक्ष दादाभाउ नाथ, दिलीप भोसले, गणेश थोरात, सुभाष पवार, रघुनाथ डफळ, राजेंद्र काटे, गणेश गावडे, सखाराम शेळके, नानासाहेब थोरात, निळकंठ कारकुड आदी उपस्थित होते.

यावेळी वाघाळे गावातील ग्रामस्थांची के.के हॉस्पिटल चे डॉ.प्रितम वाघमारे यांनी तपासणी केली तर हरिता सिटिंग चे काळुराम अभंग, उषा थोरात यांनी सहाय्य केले.कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी गणेश थोरात, संदिप धायबर यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या