तळेगावच्या स्वप्निलला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

तळेगाव ढमढेरे, ता.१४ फेब्रुवारी २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथील तिरंदाज स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे याला महाराष्ट्र शासनाचा क्रिडा क्षेत्रातील शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर झाला आहे.शनिवार(दि.17 फेब्रुवारी) रोजी मुंबर्इ येथे राज्यपाल सी.विद्यासागर व क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
स्मॄतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख 1 लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.स्वप्निल ढमढेरे याने तिरंदाजीत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा यश मिळवून महाराष्ट्राचे व भारताचे प्रतिनिधीत्व करताना कित्येक वेळा सुवर्ण व रौप्य पदक पटकावून पुणे जिल्हयाचे नाव भारतात उज्वल केले आहे.त्याच्या या क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगीरीची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने मानाचा 2016–17 चा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर केला आहे.

स्वप्निल हा पुणे जिल्हा दुध संघाचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ढमढेरे यांचा पुत्र असून लहानपनापासूनच त्याला धनुर्विद्या या खेळाची आवड होती.शालेय व महाविद्यालयीन पातळीवर देखील स्वप्निल याने पुणे विद्यापीठाचे तिरंदाजीत प्रतिनिधीत्व करून राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले आहे.आशीयार्इ व अॉलींपीक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा स्वप्निल ढमढेरेचा मनोदय आहे.त्याला हा मानाचा शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुणे जिल्हयातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या