रामलिंगला लाखो भाविकांनी घेतले प्रभू श्री रामलिंगाचे दर्शन

शिरुर, ता.१४ फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : रामलिंग (जुने शिरुर) येथे महाशिवराञ याञोत्सवानिमित्त प्रभु श्री रामलिंग महाराजांचे मंगळवार(दि.१३) रोजी लाखो भाविकांनी रांगेत उभे राहुन शांततेत दर्शन घेतले.हरहर महादेव..रामलिंग महाराज कि जय आदी घोषणांनी मंदिराचा परिसर राञीपासुनच दुमदुमुन गेला होता.
रामलिंग(जुने शिरुर) हे शिरुर शहरापासुन ३.किमी अंतरावर वसलेले गाव असुन या ठिकाणी प्रभु श्री रामलिंगांच्या पदस्परर्शाने पावन झाल्यामुळे या ठिकाणी पुरातन असे रामलिंग मंदिर आहे.या मंदिरात गेल्या आठ दिवसांपासुन याञोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रामायनाचार्य रामराव महाराज ढोक यांची रामायन कथा तसेच सात दिवसांत राज्यातील नामवंत किर्तनकारांनी अखंड हरिनाम सप्ताहात हजेरी लावली.

या काळात विविध कार्यक्रम पार पडले.सोमवार(दि.१२) रोजी शिरुर शहरातुन वाजत गाजत व हरिनामाचा जयघोष करत प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या पालखीचे प्रस्थान दुपारी अडिच वाजता  झाले. यावेळी संपुर्ण शहरात, विविध पेठांमध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या काढुन, भगव्या पताका, झेंडे, कमानी उभारुन या पालखीचे स्वागत करण्यात आले.दुपारपासुन सुरु झालेल्या या मिरवणुकित तरुण, आबालवृद्ध तसेच महिलांनी फेटे बांधुन सहभाग घेतला.यावेळी पंचक्रोशीतील अण्णापुर,तर्डोबाची वाडी, रामलिंग, सरदवाडी, कर्डेलवाडी आदी ठिकानच्या ग्रामस्थांनी पालखीच्या दर्शनासाठी राञी उशिरापर्यंत गर्दी केली होती.ठिकठिकाणी, चौकाचौकात भाविकांनी उत्स्फुर्त स्वागत केले.त्यानंतर राञी उशिरा शिरुर शहरातुन श्री रामलिंग महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जुने शिरुर(रामलिंग) कडे झाले.आज मंगळवार (दि.१३) रोजी राञी अडिच वाजता रामलिंग मंदिरात पालखीचे आगमन झाले.तत्पुर्वी राञी एक वाजता  रामलिंग महाराजांना महारुद्राभिषेक करण्यात आला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.राञी बारापासुनच भाविकांनी पालखी बरोबर रामलिंग कडे प्रस्थान केले.दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या.पहाटेपासुन अनेकांनी मंदिरात जाण्यासाठी  शिरुर शहरापासुन पायी जाणे पसंत केले.पहाटे पासुनच अण्णापुर ते शिरुर दरम्यान भाविकांच्या वर्दळीने व हरहर महादेव, रामलिंग महाराज कि जय या घोषणांनी दुमदुमुन गेला.

पहाटेपासुन शिरुर ते रामलिंग रस्त्यावर  नागरिकांच्या सोयीसाठी स्थानिकांनी चहा, फराळ यांचे वाटप केले.मंदिर परिसरात खेळणी, तसेच विविध स्टॉल्सची रेलचेल होती.भाविकांची कुठलीही गैरसोय होउ नये म्हणुन देवस्थान च्या वतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.तसेच शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दर्शनासाठी सकाळपासुन दोन-तीन किंमी लांबच लांब रांगा होत्या.सकाळी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती,दुपारी बारानंतर गर्दी काही प्रमाणात कमी झाली होती माञ दुपारनंतर पुन्हा भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती.शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, पालिकेचे सभागृह नेते प्रकाशभाउ धारिवाल तसेच शिरुर पारनेर, श्रीगोंदा आदी तालुक्यांसह भाविकांनी दर्शन घेतले.रामलिंग याञोत्सव कमिटी तर्फे भाविकांसाठी पाण्याची सोय, दर्शनासाठी पायघड्या, उन्हाचा ञास जानवु नये म्हणुन मंडप उभारला होता.शिरुर बस डेपो तर्फे दर्शनासाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या.रामलिंग ग्रामपंचायत तर्फे रस्त्याचे साफ सफाई व रुंदीकरण व काटेकोर व्यवस्था केली होती.याञेनिमित्त शिरुर ते रामलिंग हा एकेरी मार्ग तर रामलिंग ते बगाड रोड(पोदार शाळा) असा वाहतुकित बदल करण्यात आला होता.त्यामुळे वाहतुकिची कोंडी टाळण्यात प्रशासनास यश मिळाले.मंगळवार(दि.१३) रोजी राञी शोभेचे दारुकाम करण्यात आले तर श्री क्षेञ रामलिंग मंदिरावर आकर्षक विद्युत रोशनाई केल्याने मंदिर परिराला वेगळीच झळाळी निर्माण झाली होती.या वेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे,पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील, पोलीस उपनिरीक्षक केशव घोंगडे,पोलीस उपनिरीक्षक युसुफ इनामदार,संतोष कदम, उमेश भगत,जनार्दन शेळके,विजय मोरे, गणेश आगलावे, सविता आढाव यांसह महिला पोलीस, होमगार्ड आदींनी चोख बंदोबस्त पहाटे पासुन ते याञा पार पडेपर्यंत ठेवला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या