भरत दौंडकरांच्या कवितांनी विद्यार्थी गेले भारावून...

पिंपरखेड, ता.१५ फेब्रुवारी २०१८ (आबाजी पोखरकर) : पुणे जिल्हयातील सुप्रसिध्द कवी भरत दौडंकर यांच्या एकापेक्षा एक बहारदार सादर केलेल्या कवीतांनी विद्यार्थी भारावून गेले होते.

पिंपरखेड (ता.शिरुर) येथे श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावी विदयार्थी शुभेच्छा व निरोप समारंभ आणि माजी विदयार्थी संस्थेने घेतलेल्या सामान्य ज्ञान व चित्रकला परिक्षा बक्षिस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून कवी दौंडकर उपस्थित होते. कवी भरत दौडंकर यांनी काव्याच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या या वेळी टाळ्या वाजवून मुलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

माजी विदयार्थी संस्थेने डिसेंबर मध्ये घेतलेल्या सामान्य ज्ञान परिक्षेत यश प्राप्त केलेल्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या चौतीस मुलांना व चित्रकला परिक्षेत यश संपादन केलेल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या सोळा विद्यार्थ्याना गटाप्रमाणे प्रमाणपत्र व बाक्षिसाचे वितरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, ग्राम विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सत्यवान पोखरकर , संस्थापक अध्यक्ष भिवाजी बोंबे, उपाध्यक्ष रामदास बराटे, उपसरपंच रामदास ढोमे, प्राचार्य दत्तात्रय ताठे, काठापुर चे सरपंच बिपिन थिटे, माजी विदयार्थी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शेळके, डॉ. दादाभाऊ बरकले, मुख्याध्यपक श्री. कापसे, मुख्याध्यपक सुरेश शिंदे, मुख्याध्यपक लक्ष्मण कांदळकर,संचालक शांताराम दरेकर ,दिलिप बोंबे,तसेच विदयालयाचे सर्व शिक्षक, माजी विदयार्थी संस्थेचे पदाधिकारी सभासद आणि विदयार्थी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एफ एन पंचरास व माजी विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी पोखरकर यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या