उघड्यावर आलेल्या कुटुंबाला निमोणेकरांचा मदतीचा हात

मांडवगण फराटा, ता.१६ फेब्रुवारी २०१८ (प्रा.विठ्ठल गवळी) : शिरुर तालुक्याचे अग्रगण्य संकेतस्थळ असलेल्या www.shirurtaluka.com ने शेतमजुराच्या झोपडीच्या आगीबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत उघड्यावर आलेल्या कुटुंबाला निमोणेकरांनी मोठा मदतीचा हात दिला.


याबाबत सविस्तर असे कि, गारमाळ येथील शेतमजूर सावळाराम यादव धेंडे यांची झोपडी शनिवारी दुपारी बारा वाजन्याच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागून जळून खाक झाली. ही घटना दुपारी घडल्याने उन्हामुळे आगीने काही मिनिटातच झोपडी जळून गेली. या दुर्दैवी घटनेत घरातील धान्य, कपडे, किराणा, भांडी व रोख रक्कम तीन हजार रुपये जळून खाक झाले. येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वराची यात्रा सुरू होत आहे, त्यामुळे या कुटुंबाने यात्रेसाठी नवीन कपडे, किराणा, धान्य खरेदी केलेले होते.लहान मुलांसह सर्वांची कपडे जळाली आहेत. ऐन यात्रेच्या काळात उघड्यावर राहण्याची या कुटुंबावर वेळ आलेली होती.

शिरुर तालुक्याचे अग्रगण्य संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने याविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत  निमोणे येथील जयश्रीराम कृषी विज्ञान व सामाजिक संस्थेचे कोषाध्यक्ष रोहिदास काळे  व शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा कार्यध्यक्ष -भरतकाका काळेयांचे आज त्यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. या वेळी सर्व कुटुंबाला नविन कपडे तसेच किराणा वस्तूची मदत केली. त्याचबरोबर आर्थिक मदत केली.

मांडवगण फराटा येथील याञा सुरु असल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबाला कपडे तसेच आर्थिक मदत केल्याने या कुटुंबातील सदस्यांना या वेळी अश्रु अनावर झाले होते. कुटुंबाने सामाजिक दातृत्वाबद्दल निमोणेकरांचे विशेष आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या