शिक्रापूरात रोटरी क्लबच्या वतीने रविवारी महाआरोग्य शिबीर

शिक्रापूर, ता.१६ फेब्रुवारी २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : शिक्रापूर येथे रोटरी क्लबच्या वतीने रविवार (दि.18) रोजी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती शिक्रापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड व सचिव प्रा. संजय देशमुख यांनी दिली.

शिक्रापूर येथील ग्रामीण रूग्णालयात रोटरी क्लब शिक्रापूर व हडपसर, नोबल हॉस्पिटल पुणे, स्पंदन मेडिकल असोसिएशन पुणे–नगर रोड, ग्रामीण रूग्णालय शिक्रापूर व मोहन ठुसे नेत्र रूग्णालय नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी जिल्हा परीषद सदस्या कुसुम मांढरे, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, शिक्रापूरच्या सरपंच जयश्री भुजबळ, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाण्याचे अध्यक्ष पांडूरंग राउत आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

या शिबीरात मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया, स्त्रिरोग, बालरोग, अस्थिरोग, हॄदयरोग, रक्तदाब, ब्लड शुगर, हाडांची ठिसुळता तपासणी, हिमोग्लोबीन, दंतचिकीत्सा, सांधेदुखी आदीसह आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या तपासण्या तज्ञ डॉक्टर करणार असल्याचे डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी सांगीतले. या आरोग्य शिबीराचा परीसरातील नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या