दहाच दिवसांत चोरीचा गुन्हा गुन्हे शाखेकडून उघडकिस

शिरुर,ता.१७ फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : दहा दिवसांपुर्वी गोडावुन मधुन चोरलेला माल उघडकिस आणन्यात पुणे ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले असुन दोन आरोपींना अटक  करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मार्केट यार्डातीळ तंबाखूच्या एका गोडावूनमधून किंमत रुपये दोन लाख 78 हजार 400 रु. चे गायछाप तंबाखूचा माल अज्ञात आरोपीने चोरून नेली होती त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे (दि.६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्याचा समांतर तपास करून आरोपी फारुख शब्बीर शेख (रा.ढोरआळी, शिरूर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर चार साथीदार यांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली.या नंतर पोलीसांनी त्याच्याकडून त्यांनी चोरलेला 2,78,000/- किमतीचा गायछाप तंबाखूचा माल ताब्यात घेतला.तर शिरूर पोलीस स्टेशन कडून गुन्हयातील दुसरा आरोपी हर्षल मनोज काळे (रा.शिरूर) यास अटक करण्यात आली आहे.

हा गुन्हा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजु मोमीन, पोपट गायकवाड, महेश गायकवाड, दत्ताञय गिरमकर, नितीन गायकवाड, निलेश कदम आदींच्या पथकाने अवघ्या दहाच दिवसांत उघडकिस आणुन संपुर्ण माल व आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली.या पथकाचे शिरुर च्या व्यापारी वर्गातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या