शिरूरमधील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

शिरूर, ता. 17 फेब्रुवारी 2018 (सतीश केदारी): कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आणि जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग यांच्यातर्फे आयोजित "जय किसान कृषी प्रदर्शना'ला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्‍याबरोबरच जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी भेट देत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी दिली.

शेतीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुधारित औजारे खरेदी करण्याकडेही शेतकऱ्यांचा जास्त कल दिसत आहे. ठिबक सिंचन संच, त्यातील विविध प्रकार, सेंद्रिय खतांचा वापर, सुधारित बी-बियाणे, शेतीसंदर्भातील पिकांच्या उत्पादनवाढीसाठी असणारी माहितीपुस्तिका उपलब्ध असणाऱया स्टॉलवर गर्दी होत आहे. कृषी प्रदर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेता अनुचित घटना घडू नयेत, यासाठी 15 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

No automatic alt text available.

No automatic alt text available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या