श्रीपाद छिंदमच्या निषेधार्थ शिरुरला महिलांचा मोर्चा

शिरुर,ता.१७ फेब्रुवारी २०१८(सतीश केदारी) : छञपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या श्रीपाद छिंदम यांचा शिरुर ला महिलांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.


शुक्रवार(ता.१६) रोजी नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अॉडिओ क्लिप व्हायरल झाली.यात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या असल्याने महाराष्ट्रातील सर्वधर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याअसल्या कारणाने छिंदम यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी शिरुर शहरातील नागरिकांनी शिरुर शहरातुन मोर्चा काढला.या मोर्चात शिरुर शहरातील सर्वपक्षीय नागरिक व प्रामुख्याने महिलांनी शिवाजी महाराज कि जय, छिंदमचं करायचं काय, अशा घोषणा देत मोर्चा काढला.हा मोर्चा काढुन मागण्यांचे निवेदन शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना देण्यात आले.

या वेळी शिरुर नगरपालिकेचे नगरसेवक मंगेश खांडरे, संजय देशमुख, अभिजित पाचर्णे, निलेश गाडेकर,माजी नगरसेवक हाबिद शेख, हाजी मुस्ताक शेख, शैलेश जाधव,अनिल बांडे, तुकाराम खोले, संतोष शितोळे, मयुर थोरात, संजय बांडे, निलेश  खाबिया,कुनाल काळे, निलेश जाधव,रंजन झांबरे, सुशांत कुंटे,अमजद पठाण संदिप कडेकर,उमेश शेळके, अनिकेत घोगरे,प्रसन्ना भोसले, विकास साबळे यांसह श्रीगोंदा जि.प.सदस्य कोमल वाखारे, विजया टेमगिरे, अलका ढाकने, मंजुश्री थोरात, डॉ.वैशाली साखरे, प्रियंका धोञे, पल्लवी शहा, ज्योती हांडे, अनुपमा दोशी, तृप्ती लामखडे, रुपाली खांडरे, ज्योती ठोकळ, सारिका विरशैव, नंदा खैरे आदींसह शिरुर शहरातील नागरिक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या