दयानंद गावडे यांना 'पोलीस महासंचालक सन्मान' पुरस्कार

पुणे, ता. २० फेब्रुवारी २०१८ (सतीश केदारी) : गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जाणारे पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांना 'पोलीस महासंचालक सन्मान' पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

राज्य पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांना हा राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडुन हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी( १ मे) ला केले जाते.पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणा-या अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी हा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येते.या जाहिर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये पुणे शहर, ग्रामीण व राज्य राखीव च्या ६५ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांनी गुन्हे शाखेची सुञे हाती घेतल्यानंतर अनेक धाडसी कारवाया करत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.तर अनेक गुन्ह्यांत शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्याचीही कामगिरी केली आहे. शिरुर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी करत पोलीस स्टेशनचा चेहरामोहरा बदलावण्यात महत्वाची भुमिका पार पडली.त्यांच्या या जाहिर  झालेल्या पुरस्काराबाबत सर्वस्तरांतुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या