छत्रपतींचे विचार आज ही आत्मसात करण्याची गरज: प्रा. खामकर


Image may contain: 3 people, people standing
कवठे यमाई
, ता. 20 फेब्रुवारी 2018: (सुभाष शेटे):
एक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून ज्यांना जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान प्राप्त झाले अशा आपल्या महाराष्ट्रातील तमाम रयतेचे भूषण व आराध्य दैवत असना-या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रगल्भ विचार आज ही आत्मसात करण्याची व मना मनांत रुजविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहिःशाल व्याख्याते प्रा. प्रशांत खामकर यांनी केले.

कवठे येमाई येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित शिवजयंती उत्सवात प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपक रत्नपारखी हे होते.

या वेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य सुदाम इचके, लोकशाहीर अर्जुन अण्णाभाऊ शिंदे, राजेंद्र सांडभोर, निलेश वागदरे, सनी रेणके, शरद घोडे, स्वप्नील कांदळकर, रामदास इचके, बाजीराव उघडे, बाळासाहेब डांगे, दत्ता घोडे अनेक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी बोलताना प्रा. खामकर पुढे म्हणाले कि, 'छत्रपतीं शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध सैन्य व मजबूत विचारांच्या यंत्रणेच्या बळावर सामर्थ्यवान व प्रगतिशील राज्य त्या काळात उभे केले. गनिमी काव्याच्या तंत्राचा यशस्वीपणे वापर करीत जलद हालचाली व बलाढ्य शत्रूंचे खच्चीकरण करण्याचे काम करीत त्यांना अनेकदा नेस्तनाबूत केले. शत्रपतींनी किनारी व भू प्रदेशातील किल्ल्यांची सुधारणा करतानाच अनेक नवे किल्ले ही उभारण्याचे काम केले. मराठी भाषेचा राज्यकारभारात वापर करण्यास राजानी त्या काळात ही प्रोत्साहन दिले होते. तर अमेरिके सारख्या बड्या राष्ट्राशी सुमारे २७ वर्षे युद्ध करताना व्हिएतनाम सारख्या छोट्या राष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा आदर्श समोर ठेवत व राजांच्या गनिमी काव्याच्या नीतीचा अभ्यास करीत अमेरिका सारख्या मोठ्या देशाच्या सैन्यास जेरीस आणले होते. अशा या स्व कर्तृत्वानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी अंगिकारण्याची गरज आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या