दोन अपघातांत दोन जागीच ठार; एक गंभीर जखमी

शिरुर/ रांजणगाव गणपती, ता.२१ फेब्रुवारी २०१८ (प्रतिनीधी): कार व ट्रक च्या भिषण अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना खंडाळे माथा येथे घडली तर ट्रक च्या धक्कयाने दुचाकी चालकाचा मृत्यु झाल्याची घटना शिरुर येथे घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खंडाळे माथा येथे पुणे नगर महामार्गावर आय २० कार(एम.एच.११ बी.व्ही ००८२) यातील चालक व तीन व्यक्ती अशा अहमदनगर कडुन पुणे दिशेने जात होते.तर रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक (एम.पी०९ एच.एच.४४४०) हीस कारची मागुन धडक जोरदार धडक बसली.यात सुरेश तनपुरे (रा.राहुरी कारखाना, अहमदनगर) याचा जागीच मृत्यु झाला तर योगेश फुलचंद जोशी गंभीर जखमी झाले असुन इतरांना किरकोळ मार लागला. अपघाताची माहिती कळताच रांजणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना बाहेर काढले व वाहतुक सुरळित केली.या प्रकरणी पुढिल तपास  रांजणगाव पोलीस करत आहेत.

ट्रकचा धक्का लागुन एकाचा जागीच मृत्यू
पाबळ फाटा नजीक दुचाकी वळण घेत असताना ट्रकचा धक्का बसल्याने दुचाकीवरील चालकाला गंभीर मार बसुन जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवार (दि.२०) रोजी सायंकाळच्या सुमारास शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारासमोर घडली.याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात भरत तुकाराम शिरसले(वय.४२,सध्या रा.रिलायन्स पेट्रोल पंप, शिरुर , मुळ गांव-लातुर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.घडलेली अशी कि, मयत भरत शिरसले हे आपल्या प्लॅटिना दुचाकी(एम.एच.१६ बी.एन ८६६१) वरुन चालले होते.दरम्यान मार्केट यार्ड समोर आले असता, शासकिय गोडावुन वरुन धान्य मोकळे करुन चाललेला ट्रक(एम.एच.१२ डी.जी २१७) याची दुचाकीला वळत असताना धडक बसली.या धक्कयाने दुचाकीवरील शिरसले हे खाली पडले व गाडी खाली आले. त्यात त्यांचा गंभीर मार बसल्याने जागीच मृत्यु झाला.या प्रकरणी शिरुर पोलीसांनी ट्रकचालकावर गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या