...अखेर ४८ तासांनी शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश

Image may contain: 5 people, people standing and outdoor

पारोडी,
ता.२१ फेब्रुवारी २०१८ (सतीश केदारी) :
बंधा-याच्या पाण्यात बुडालेल्या शेतक-याच्या मृतदेहाला तब्बल  ४८  तासांनी शोधण्यात एनडीआरएफ च्या पथकाला यश आले.माञ यात प्रशासनाचा हलगर्जीपणा प्रकर्षाने दिसुन आला.

सविस्तर माहिती अशी कि, दादा  गबाजी साळुंखे (वय.५३)यांचा सोमवार(दि.१९) रोजी शिवतक्रार म्हाळुंगी येथील नदीवरील  पाण्यात बुडुन मृत्यु झाला होता. हि घटना कळताच स्थानिकांनी सोमवारी शोध घेतला परंतु सोमवारी मृतदेह मिळुन आला नाही.त्यानंतर मंगळवार(दि.२०) रोजी पर्यंत त्यांचा सकाळपासुन बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही या प्रयत्नांना दिवसभर यश आले नाही.

आज बुधवार(दि.२१) रोजी एनडीआरएफ ची टिम दाखल झाली.या पथकाने अत्याधुनिक बोटीच्या साहाय्याने सकाळपासुन सुरुवात केली.सुरुवातीला पथकातील जवानांनी पाण्यात बुड्या मारुन शोध घेतला परंतु तरीही बुडाला असल्याचे ठिकाण सापडत नव्हते.अखेरीस दुपारी एकच्या दरम्यान पुन्हा शोध मोहिम राबविली असता पाण्यात मध्यभागाच्या काही अंतरावर मृतदेह हाती लागला.त्यानंतर जवानांनी मृतदेह तत्काळ बाहेर काढला.मृतदेह बाहेर आल्यानंतर साळुंखे कुटुंबातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला.

मृतदेह टमटममूधून...
दरम्यान घटनास्थळी मृतदेह नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करणे गरजेचे होते.परंतु प्रशासनाच्या वतीने अॅम्ब्युलन्स उपल्ब्ध करण्यात आली नव्हती.त्यामुळे घटनास्थळी मृतदेह कशात न्यायचा हा प्रश्न निर्माण झाला.अखेर शेवटी स्थानिक ग्रामस्थांनी एका छोट्या टमटम मध्ये घालुन मृतदेह घटनास्थळापासुन हलविला.प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.घटनास्थळी शिक्रापुर पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी, तलाठी जी.एस.घुमे हे उपस्थित होते. शिरुरचे तहसिलदार माञ अनुपस्थितच होते.

ही शोध मोहिम एनडीआरएफ टिमचे नवीन चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली २० जवानांनी  पार पडली. तर शिरुर बाजारसमितीचे संचालक  विकास आबा शिवले व स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या