मिलिंद एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर

शिक्रापूर,ता.२४ फेब्रुवारी २०१८ (शेरखान शेख) : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्देशानुसार हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख व पुण्याचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे हे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी स्वतः हजर झाले होते.
कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी रोजी दंगल झाली व ती दंगल सर्वत्र गाजली गेली परंतु या दंगलीप्रकरणी हिंसाचाराचे गुन्हे दाखल असलेले मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशीसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बोलाविण्यात आले होते, यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सुमारे चार तासाहून अधिक काळ त्यांची गुपितपणे चौकशी केली. तर यावेळी बोलताना अधिक  चौकशीसाठी मिलिंद एकबोटे यांना पुन्हा बोलविण्यात येणार असल्याचे डॉ. संदीप पखाले यांनी सांगितले.

दरम्यान मिलिंद एकबोटे यांच्या करण्यात आलेल्या चौकशीत काय विचारण्यात आले याबाबत काहीही समजू शकले नाही. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे याना अटक करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत होती. एकबोटे यांच्या वर अँट्रिसिटी सह दंगलप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु एकबोटे यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकबोटे यांच्या अटकेला  न्यायालयाने १४ मार्च पर्यत अंतरिम जामीन दिला असून न्यायालयाने एकबोटे यांच्या चौकशीचे ही निर्देश दिले होते तसेच पोलिसांना चौकशी कामी सहकार्य करावे असे एकबोटे यांनाही सूचना केली होती.

त्यानुसार शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी  सव्वा अकराच्या सुमारास मिलिंद एकबोटे हे आपल्या काही नातेवाईक व वकिलासह शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आले.एकबोटे यांच्या चौकशीबाबत मोठ्या प्रमाणावर गुप्तता पाळण्यात आली होती. सुमारे चार तासाहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले,  उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश मोरे, शिक्रापु र चे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी एकबोटे यांची चौकशी केली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास एकबोटे पोलीस स्टेशनचा बाहेर पडले. तर त्यांनतर बोलताना मिलिंद एकबोटे हे सापडत नसल्याचे बोलले जात होते परंतु यापूर्वी एकबोटे हे तपासासाठी पुढे येत होते, आम्हाला काही पुरावे उपलब्ध करण्यासाठी त्यांची कोठडी मागत होतो असे देखील संदीप पखाले यांनी सांगितले.


यातून लवकरच बाहेर पडू ...
मिलिंद एकबोटे हे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मिलिंद एकबोटे यांनी बोलण्यास नकार दिला मात्र या गुन्हयामध्ये विनाकारण गोवण्यात आले असून यामधून लवकरच बाहेर पडू असे मिलिंद एकबोटे यांचे बंधू नंदू एकबोटे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या