गावोगावी स्पर्धापरिक्षातुन अधिकारी घडावेत: युनूस शेख

शिरसगाव काटा,ता.२५ फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : गावोगावातुन स्पर्धा परिक्षांतुन अधिकारी घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सहायक पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी व्यक्त केले.
शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथे शिवछञपती मिञमंडळाच्यावतीने शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, निर्वी,कोळगाव डोळस या शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत सहभाग घेतला होता.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम, ट्रॉफी असे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन युनुस शेख हे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी मनात स्पर्धा-परिक्षांचा न्युनगंड न बाळगता आतापासुनच तयारीला लागणे गरजेचे आहे.त्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे असे यावेळी ते म्हणाले.यावेळी शिरुर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी, शिरुर तालुक्याचा राज्यात शिष्यवृत्तीच्या बाबतीत उच्चांक असुन शिरुर तालुक्याचे विद्यार्थी स्पर्धा-परिक्षांबाबत जागरुक आहेत.देशात अन राज्यात उत्तीर्ण होणा-या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत  असुन ग्रामीण भागात हि चांगली बाब असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुनन नमुद केले.बाजार समितीचे सभापती विजेंद्र गद्रे यांनी स्पर्धा परिक्षांबरोबरच खेळाकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

या प्रसंगी माजी सभापती दादासो कोळपे,घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, माजी सरपंच तात्यासो सोनवणे, माजी सरपंच संजय शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली.यावेळी पोलीस कॉंस्टेबल हमीद शेख, सरपंच सतीश चव्हाण, पोलीस पाटील शितल गायकवाड,विनायक जगताप, किरण जगताप,शरद चोरमले, माणिक कदम, सचिन नलगे आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवछञपती मंडळाचे राहुल कदम, किरण काटे, जयदिप पवार, सागर ईगावे,मेजर विलास काळे, सचिन विधाते, काशिनाथ काटे, सचिन आवारे, सुर्यकांत गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
(लहान गट)
प्रथम क्रमांक -सोहम सुधीर बेंद्रे
द्वितीय क्रमांक- करिश्मा ज्ञानेश्वर फडतरे
तृतीय क्रमांक- वैष्णवी दिलीप चव्हाण

(मध्यम गट)
प्रथम क्रमांक -अविष्कार दिलीप चव्हाण
द्वितीय क्रमांक- ज्ञानेश्वर मच्छिंद्र इंगळे
तृतीय क्रमांक- सार्थक धनाजी विधाते

(मोठा गट)
प्रथम क्रमांक-प्रशांत कांतिलाल जगताप
द्वितीय क्रमांक-निखिल विधाते
तृतीय क्रमांक-पुजा लक्ष्मण शिंदे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या