विद्यार्थ्यांना तब्बल १८ वर्षांनी एकत्र येण्याचा योग

Image may contain: 25 people, people smiling

विठ्ठलवाडी, ता. 28 फेब्रुवारी 2018 (एन. बी. मुल्ला):
येथील श्री पांडुरंग विद्या मंदीर मधील शैक्षणिक वर्ष १९९९-२००० मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

तब्बल १८ वर्षांनी एकत्र येण्याचा योग आल्याने जुण्या सवंगड्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामराव दौंडकर होते. या सोहळ्याचे आयोजन पाणी समितीचे अध्यक्ष संदिप गवारे, संतोष गवारे ,शामराव गवारे यांनी केले .अध्यक्षीय भाषणात दौडकर यांनी विद्यार्थी कसे घडवावे, शाळा कशी उभी केली याबद्दल सागितले. या कार्यक्रमास कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रविणकुमार जगताप ,मुख्याध्यापक राजाराम नजन, सुरेश थोरात, प्रभाकर चादगुडे, बाळासाहेब गायकवाड, बी. वाय. वाघ, विठ्ठल गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुधिर गवारे, मुरलीधर गवारे, सुधिर लोले, राणी वडघुले, अर्चना लोले, उज्वला साकोरे, अतुल गवारे संदिप चौधरी, अमोल दौडकर, विद्या रणपिसे, सीमा ढोकले, उषा वाजे, सुवर्णा जाधव, अमिना शेख, विकास कातोरे आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. माजी विद्यार्थानी आपल्या भाषनामध्ये आपण कसे घडलो. आपण आपल्या मुलावर कसे संस्कार केले पाहीजे या बाबी अनुभवातुन सागितल्या. या कार्यक्रमात शालेय साहित्यासाठी ३ हजार रूपयांचा धनादेश माजी विद्यार्थानी शाळेला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस बी कंपनीचे व्यवस्थापक राहुल गायकवाड यांनी केले तर अलका शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या