शिरूर तालुक्यात चारा साठविण्यासाठी लगबग

तळेगाव ढमढेरे,ता.१ मार्च २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुक्यात चारा साठविण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू झाली असून मिळेल तीथून सुका चारा ट्रॅक्टर–ट्रॉली व बैलगाडीच्या सहाय्याने आणून तो रचून ठेवला जात आहे.

शिरूर तालुक्यात विशेषता एप्रिल व मे महिण्यात मोठया प्रमाणात चारा टंचार्इची समस्या निर्माण होते.त्यामुळे शेतकरी सध्या सुकलेले गवत, ज्वारी बाजरीचा कडबा मिळेल त्या भावाने विकत घेवून साठवून ठेवत आहेत.शहरातील कांही व्यापारी कडबा खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागात येतात व चढया भावाने कडबा खरेदी करून शहरातील मोठ मोठया गोटयांकडे पाठवत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे खेडयातील शेतक-यांची मोठीच कुचंबणा होत आहे.उन्हाळयात चा-याचे भाव गगणाला भिडण्याची शक्यता असल्याने सध्या शेतकरी मिळेल तेथून चारा विकत घेवून ट्रॅक्टर–ट्रॉली व बैलगाडीच्या सहाय्याने चा-याची वाहतुक करून साठवून ठेवत आहेत.उन्हाळयात व पावसाळयाच्या पूर्वार्धात गुरांना चारा मिळावा म्हणून ग्रामीण भागात ज्वारी व बाजरीच्या कडब्याची गंज रचण्यात शेतकरी मग्न आहेत.

रचलेली गंज व वळइ प्लॅस्टिकच्या कागदाने व्यवस्थित झाकून ठेवली जाते की ज्यामुळे पावसापासून चा-याचे रक्षण होते व चारा खराब होत नाही.चालू वर्षी दुष्काळी परीस्थिती पहाता चा-याचे दर गगणाला भिडण्याची शक्यता असल्यानेच शेतक-यांनी मिळेल तेधून चारा आणून तो साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या