वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा-पी.जी.चांदगुडे

विठ्ठलवाडी,ता.१ मार्च २०१८(प्रतिनीधी) :  'विज्ञान हा मानवी जीवनाचा मुलाधार असुन , वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारल्यास मानवाचे कल्याण होईल ' असे मत ज्येष्ठ विज्ञान शिक्षक पी.जी. चांदगुडे यांनी केले.

श्री पांडुरंग विदया मंदिर, विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.विदयालयाचे मुख्याध्यापक आर.एस.नजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी थोर शास्त्रज्ञ सी.व्ही. रामण यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अक्षय वारकरी, सिद्धार्थ उबाळे, सौरभ लासुरकर,सुरज तळेकर, प्रतिक्षा गवारी, सानिया शेख, प्रियंका मरगळे या विदयार्थ्यांनी व पी.जी. चांदगुडे, ए.बी. शिंदे, व्ही.डी. कुंभार या शिक्षकांनी आपले वैज्ञानिक विचार व्यक्त केले.

मुख्याध्यापक आर.एस.नजन, बी.वाय. वाघ, पी.जी. चांदगुडे,ए.बी. शिंदे, बी.ई. गायकवाङ, एस्.एस. गवारी, व्हि. डी. कुंभार इ . शिक्षक विदयार्थी उपस्थित होते.श्रृती पाबळे हिने सुत्रसंचालन तर बी.ई. गायकवाड यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या