महिलादिनानिमित्त वारसा फौंडेशनतर्फे महिलांचा सन्मान

Image may contain: 16 people, people smiling, people standing and wedding
शिरुर, ता.१० मार्च २०१८ (प्रतिनीधी) :
जागतिक महिलादिनानिमित्त वारसा फौंडेशनतर्फे शिरुर शहरात महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उल्लेखनिय क्षेञात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिलांना सन्मानपञ देउन गौरविण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल विद्या बनकर यांना कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी,गोकुळ डेअरी संचालिका कल्पना गांधी यांना, राजकिय मध्ये शिरुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे,विक्रांत थोरात, अॅड.सिमा काशीकर, शशिकला काळे, शोभना पाचंगे, लता नाझिरकर, भारती बारवकर, अनघा पाठक, विद्या घावटे, राणी कर्डिले, ज्योती हांडे, डॉ.वैशाली साखरे, चंदना गायकवाड, सुवर्णा सोणवणे, प्रियंका धोञे आदी उपसस्थित होते.

या कार्यक्रमासाठी वारसा फौंडेशनच्या अध्यक्षा प्राची दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुश्री थोरात, शिल्पा बढे, अनुपमा दोशी, अलका ढाकने, वर्षा नारखेडे, तृप्ती लामखडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या