कवी भरत दौंडकर यांची कवी संमेलनासाठी निवड

निमगाव म्हाळुंगी , ता.१० मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील कवी भरत दौंडकर यांची राज्यस्तरीय कवी संमेलनासाठी व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे.

भारतीय साहित्य अकादमी तर्फे 2018 च्या नॅशनल पोयट्री मेट साठी सर्व राज्यातून प्रत्येकी एक कवी निमंत्रित केले जातात.त्यानुसार महाराष्ट्रातून मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कवी भरत दौंडकर यांची निवड करण्यात आली आहे. हे कवी संमेलन दि 15 व 16 मार्च रोजी मिझोराम ची राजधानी ऐझवाल येथे होणार आहे.

भरत दौंडकर हे संवेदनशील कवी समजले जात असुन त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या गुंठा गुंठा जमीन विकुन ही कवीता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिरुर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या