शिरुर नगरपालिकेच्या बांधकाम सभापतीपदी अभिजित पाचर्णे

शिरूर, ता.११ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर नगरपालिकेच्या बांधकाम सभापतीपदी अभिजित पाचर्णे यांची नुकतीच निवड करण्यात आली.सर्वात कमी वयात त्यांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे.

शिरुर नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड नुकतीच शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी ही निवड करण्यात आली.नगरसेवक अभिजित पाचर्णे हे २०१७ च्या झालेल्या सार्वञिक निवडणुकित प्रभाग क्र.४ मधुन शिरुर शहर विकास आघाडीकडुन निवडुन आले आहेत.गेल्या वर्षभरात त्यांनी या माध्यमातुन प्रभागात अनेक कामे केली आहेत.निवडीनंतर बोलताना सभागृह नेते प्रकाशभाउ धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात काम करणार असुन जनतेच्या जास्तीत जास्त अडचणी सोडविण्यावर व विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिजित पाचर्णे यांचे वडील गणेश पाचर्णे हे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणुन निवडुन आले होते.त्याचप्रमाने अभिजित पाचर्णे यांनी नगरसेवक होउन अवघ्या कमी वयात शिरुर नगरपालिकेच्या बांधकाम सभापतीपदावर विराजमान होण्याचा मान मिळविला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल शहरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या