'खासगी साखर कारखान्यांमुळे शेतकऱयांवर होतोय अन्याय'

Image may contain: phone
शिरूर, ता. 14 मार्च 2018:
शिरूर तालुक्यातील खासगी साखर कारखान्यांमुळे शेतकऱयांना अन्याय होत आहे, असा कौल नेटिझन्सनी www.shirurtaluka.com वर नोंदविला आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने 5 ते 11 मार्च या कालावधीमध्ये मतचाचणी घेतली होती. यावेळी नेटिझन्सनी खासगी साखर कारखान्यांमुळे 100 टक्के शेतकऱयांवर अन्याय होत असल्याचा कौल दिला आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची वेळ आली आहे.

मतचाचणी पुढीलप्रमाणेः

शिरूर तालुक्यातील खासगी साखर कारखान्यांमुळे शेतकऱयांना अन्याय होत आहे, असे आपणास वाटते काय?
होय - 100 टक्के
नाही - 0 टक्के
माहित नाही - 0 टक्के


जातेगाव  येथील खाजगी साखर कारखान्याच्या सोयीसाठी या भागातील तब्बल २२ गावांमध्ये घोडगंगा साखर कारखाना शेतकऱ्यांकडून ऊस उचलला जात नसल्याची तक्रार घोडगंगा साखर कारखान्याचे शासन नियुक्त संचालक अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी साखर संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांचेकडे केली आहे. शिवाय, रावसाहेबदादा पवार सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच आठ वर्षांपूर्वी व्यंकटेशकृपा शुगर मिल्स हा खाजगी साखर कारखाना सुरू झाला आणि शिरुर तालुक्यातील सहकारी व खाजगी असा राजकीय संघर्ष सुरू झाला. त्यातूनच काही मुद्द्यांच्या अधारे थेट साखर संचालकांकडे नुकत्याच तक्रारी करण्यात आल्या असून तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले आहे. दरम्यान एकुण सर्व तक्रारींतील प्रमुख तक्रार म्हणजे व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या कारखान्याच्या साधारण १५ ते २० किलोमिटरच्या परिसरात घोडगंगाकडून ऊस उचलला जात नसल्याचे सांगण्यात आले असून यातील बहुतेक गावांची ऊस उत्पादन क्षमता साधारण ५० ते ७० हजार टन एवढी आहे, असेही पलांडे यांनी म्हटले आहे.

खासगी साखर कारखान्यांच्या फायद्यासाठी शेतकऱयांचा ऊस तोडणीसाठी टोळी पाठवली जात नाही. शेतकऱयांच्या उसाकडे लक्ष दिले जात नसल्याच्या विविध तक्रारी शेतकरी करत आहेत. दुसऱया बाजूला खासगी साखर कारखान्यांचे मालक मोठा फायदा घेत आहेत. यामध्ये शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु, खासगी साखर कारखाने हे राजकीय नते व त्यांच्या नातेवाईकांचे असल्यामुळे आवाजही उठवला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा शेतकऱयाला रस्त्यावर उतरावे लागेल, असेही शेतकऱयांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या