शिरुर शहरात सार्वजनिक मुता-यांचा प्रश्न गंभीर

शिरुर, ता. १५ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर शहरात सार्वजनिक मुता-यांचा प्रश्न गंभीर असुन महिलांसह पुरुषांनाही या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे दिसते.

शिरुर बाजारपेठ हि शिरुर,पारनेर,श्रीगोंदा या तीन तालुक्याला जोडलेली असल्याने अनेक नागरिक मोठ्या संख्येने शहरात येतात.त्या मध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते.त्याचबरोबर शिरुर शहरात मुख्य चौकात एक ठिकाणचे अपवाद वगळता सार्वजनिक मुता-यांची व्यवस्था नसल्याचे पहावयास मिळते.अनेकदा महिलांसह पुरुषांनाही सार्वजनिक ठिकाणी मुता-या नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.हि अडचण लक्षात घेउन यापुर्वी शिरुर शहरातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मुता-यांची व्यवस्था व्हावी या पुर्वी आंदोलने ही केली होती.परंतु त्यावर नंतर काय झाले कि विसर पडला असा सवाल शिरुरकर नागरिक करत आहेत.

नुकताच सर्वञ महिलादिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.परंतु दैनंदिन जीवनाशी निगडित व आरोग्याशी भेडसावणारा हा प्रश्न माञ अनुत्तरितच राहिला असल्याचे पहायला मिळत असुन शिरुर शहरात सार्वजनिक मुता-या कधी निर्माण होणार असा  सवाल सर्वसामान्यांकडुन केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या