जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेत इंग्रजी भाषेचे ज्ञान महत्वाचे

हिवरे, ता.१६ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : आजच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेत ज्ञानभाषा व व्यवहार भाषा म्हणून इंग्रजी भाषा अवगत करणे महत्वाचे आहे. नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी प्राप्त  होण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले.

पिंपळे-हिवरे (ता.शिरुर) येथील स्वातंत्र्यसेनानी शं. बा.डावखरे विद्यालयात आयोजीत 'इंग्लिश लर्निंग क्लबच्या' उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यभान बर्वे, क्लबचे संयोजक मनोज नायकवडी, शामराव साळुंके,कल्याण कडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

'ईएलसी क्लब' अंतर्गत विद्यार्थ्यांनी शब्दकोडी खेळ, शब्द प्रत्यय, एका शब्दापासून वाक्यनिर्मिती, समान अर्थी -विरुध्द अर्थी शब्द, एकवचन- अनेकवचन, उप वाक्यनिर्मिती, आय एम द किंग  या सारखे प्रकल्प विविध शैक्षणिक साधनांद्वारे सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सूर्यभान बर्वे यांनी केले तर प्रा. घोडके  यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या