शिरुर पोलीसांकडून दारुअड्ड्यांवर कारवाई

शिरुर, ता. १७ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांच्या पथकाने विविध ठिकाणी अचानक धाडी टाकुन दारुअड्डे उद्धवस्त करुन रसायनांसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजेवाडी येथे घोडनदीचे कडेला काही व्यक्ती हे बेकायदा गावठी हातभट्टी तयार करत असल्याची माहिती मिळाली.यावेळी पोलीसांनी छापा टाकुन दारु तयार करण्याचे कच्चे रसायन जागीच मिळुन आले.दरम्यान पोलिसांची चाहुल लागताच यातील आरोपी घटनास्थळावरुन पळुन गेले.या मध्ये पोलीसांना 98000/- रूपये  किमतीचे 2700 लीटर कच्चे रसायण 18 बॅरलसह मिळुन आले असुन यातील कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले.तसेच याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.दुस-या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 85000/- रूपये  किमतीचे 3000 लीटर कच्चे रासायण बॅरलसह मिळुन आले. असुन याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.त्याचप्रमाने मांडवगण फराटा हद्दीतील नागरगाव येथेही छापा टाकुन कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असुन तयार दारु जप्त करण्यात आली असुन दारु तयार करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, संजु जाधव, गणेश आगलावे, अंकुश आंबेकर आदींनी सहभाग घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या