'पोलिसांना मी हप्ता देतोय, ते काहीच करू शकत नाहीत'

Image may contain: plant, sky and outdoor
शिक्रापूर, ता. 17 मार्च 2018:
शिक्रापूर पोलिसांनी मी हत्ता देतो... पोलिस माझे काहीच करू शकत नाहीत. तुम्हाला माझ्याकडून घर बांधकामासाठी साहित्य घ्यावेच लागेल, अशी दमबाजी करून एक ठक सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे.

शिक्रापूर परिसरात अनेकजण जागा खरेदी करत असून, त्या जागेमध्ये बांधकाम करत आहेत. जागा खरेदीकरणाऱयांमध्ये बाहेरगावच्या नागरिकांचा मोठा समावेश आहे. या जागेंवर सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, पोलिसांच्या नावाने धमकावून पैसे मिळविण्याचे मोठे साधन निर्माण झाले आहे.

शिक्रापूर परिसरामध्ये बांधकाम सुरू झाले की हा ठक त्या ठिकाणी जाऊन बांधकाम करणाऱया मालकाला आपल्याकडून वाळू, सिमेंट, विटा व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आग्रह धरतो. सहाजिकच इतरांपेक्षा हे दर जास्त व वस्तूंचा दर्जा दुय्यम असतो. यामुळे बांधकाम करणारे हे वस्तू खरेदी करण्यास नकार देण्याचा प्रयत्न करतात.

आपल्याकडून साहित्य खरेदी न केल्यास हा ठक धमकी देतो. पोलिसांनी मी हप्ता देतो, पोलिस माझे काही करू शकत नाहीत. तुम्ही कुठेही जा... परंतु, खरेदी माझ्याकडून करावी लागेल... खरेदी न केल्यास तुम्ही बांधकाम कसे करता ते पाहतोच... अशी धमकी देतो. यामुळे या परिसरामध्ये बांधकाम करणारे भयभित झाले आहेत. यामधूनच अनेकजण नायलाजस्तव दुय्यम दर्जाच्या वस्तू खरेदी करतात. परंतु, पुढे यामधून बांधकाम पडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थानिकांचा त्रास नको व पोलिसांचा ससेमिरा पाठिमागे नको म्हणून अनेकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असून, पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळतात. परंतु, दुय्यम दर्जाच्या वस्तूंमुळे भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. पोलिसांनी धमकाविणाऱयांच्या विरोधात वेळीच याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या