रांजणगाव वसाहतीतील 'बिंगो'ला अभय कोणाचे ?

शिरूर, ता. २० मार्च २०१८ (धर्मा मैड) : शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार व बेकायदा  गुटखा विक्री चे धंद्याचा मोठा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे  अशा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये बोकाळलेला अवैध धंद्याला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेज हक लगाम घालणार का? याबाबत या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

शिरूर तालुक्यातील  रांजणगाव, कारेगाव या प्रमुख गावांमध्ये आजही  बेकायदेशीर पणे जुगार, मटक्याचे बिंगो जुगाराचे धंदे असलेले अड्डे व बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणारे दुकाने बिनधास्तपणे चालू आहेत. या गावांसह ढोकसांगवी, सोनेसांगवी व परिसरातील गावांमध्ये मोठ्या  प्रमाणात  अशा अवैध धंद्याचा सुळसुळाट आहे. परंतु संबंधित रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील पोलीस सर्व काही आलबेल असल्याचे भासवत आहे.

अशा या  तरूण पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या व पोलीस ठाण्याचे आर्थिक हितसंबंध जोपासून चालणाऱ्या  अवैधधंद्याबाबत स्थानिक  पातळीवरील जबाबदार व प्रमुख नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात असुन केवळ पोलिसांच्या विरोधात तक्रार केली तर पोलीस आपल्याला त्रास देतील या भितीने स्थानिक नागरिक पुढे येण्यास घाबरत असल्याचे काही स्थानिकांनी सांगितले.

रांजणगाव  औद्योगिक वसाहतीतील व परिसरातील  गावांमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्याच्या बाबतीत रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अवैध धंदे बोकाळले अशा आशयाचे वृत्त www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते. या परिसरातील गावांमधील नागरिकांच्या वतीने या वृता बाबत आभार मानुन सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली असल्याची भावना जाणकार नागरिकांनी  व्यक्त केली. तर काही जबाबदार कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालणाऱ्या अवैध धंद्याचा व त्यावर  पोलिसांकडून  होणाऱ्या  कारवाईचा पाढा बोलताना वाचून  दाखवला.

रांजणगाव गणपती व कारेगाव या औद्योगिक वसाहत वसाहतीतील गजबजलेल्या गावांमध्ये बेकायदेशीरपणे बिंगो (गुडगुडी)या अवैध जुगाराचे या पोलीस ठाण्याचे आशीर्वादाने खुलेआम भर बाजारात एका रांगेत परप्रांतीय  लोकांनी दुकाने थाटलेली आढळून आली असून या जुगाराचे सुमारे शंभराच्या आसपास दुकाने राजरोसपणे या गावांमध्ये  चालत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असुन या अवैध जुगार धंद्यातुन मोठी आर्थिक कमाई पोलीस ठाण्याला मिळत असल्याचे समजत
या खुलेआम चालणाऱ्या दुकानात जास्त पैसे हा बिंगो  जुगार खेळून कमावण्याच्या अमिषाला कंपनी मध्ये  चोविस तास राबणारा कामगार बळी पडत आहे. त्यामुळे कष्टकरी वर्गाचे आयुष्य  उद्ध्वस्त होईल अशी भीती जबाबदार नागरिक व्यक्त करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या