शिरुर बाजारसमितीचा पोलीसांना तक्रारी अर्ज


शिरूर, ता.२२ मार्च २०१८ (प्रतिनीधी) :
शिरुर बाजारसमितीच्या अधिका-यांनी शिरुर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिल्याने राजकिय वर्तुळात चर्चा ऐकायला मिळत आहेत.

शिरुर बाजारसमितीच्या सचिव व कोषाध्यक्ष यांनी शनिवारी (ता. १७) घडलेल्या घटनेबाबत शिरुर पोलीसांना माहितीस्तव तक्रारी अर्ज सादर केला आहे. या दिलेल्या अर्जात, शनिवारी (ता. १७) दोघेही बाजारसमितीच्या कार्यालयात काम करत असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास संचालक प्रकाश पवार हे कार्यालयात आले व प्रोसेडिंग बुक व कागदपञे पहायची आहेत असे सांगितले.

यावेळी रजिस्टर दाखवत असताना पवार यांनी प्रोसिंडिंग बुक व इतर रजिस्टर उचलुन दुसरे संचालक मानसिंग पाचुंदकर यांच्याकडे दिला. दरम्यान, विनवनी करत असताना दमदाटी करुन प्रोसेडिंग व रजिस्टर नेले तसेच हे बुक उघडून पाहिले असता गैरहजर ठिकाणी सह्या केल्याचे म्हटले आहे. या घटनेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

नियम काय सांगतो?
बाजार समितीचे संचालक हे सलग बैठकींना गैरहजर राहत असतील तर त्यांचे सचांलकपद हे रद्द होऊ शकते.

राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह...
राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह जोरात सुरू असून, त्याचे पडसाद सतत उमटताना दिसतात. यामधूनच राजीनामा नाट्य सारखे प्रकार घडले आहेत. प्रकाश पवार व मानसिंग पाचुंदकर हे बाजार समितीच्या बैठकांना उपस्थित राहिले नव्हते. यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यासाठी जोरदार हालचारी सुरू होत्या. यामुळे गैरहजेरीच्या ठिकाणी सह्या केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या