शिरुर पोलीसांनी टाकळी हाजीत केल्या दारुभट्ट्या उद्धवस्त

टाकळी हाजी, ता. २७ मार्च २०१८(प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशनचे फौजदार सोमनाथ वाघमोडे यांच्या पथकाने टाकळी हाजी परिसरातील दारुभट्टया उद्धवस्त केल्या.

याबाबत फौजदार सोमनाथ वाघमोडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, टाकळी हाजी परिसरातील तामखरवाडी येथे नदीच्या कडेला झुडुपात अवैधरित्या दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार या पथकाने नदीच्या किनारी जाउन पाहिले असता  एक इसम दारु तयार करणा-या ठिकाणी थांबलेला होता.पोलीस आल्याची चाहुल लागताच त्याने पळुन गेला.सदर ठिकाणी ६ निळे प्लॅस्टिकचे २०० लिटर कच्चे रसायन, ८ निळे रिकामे बॅरल, एक ५०० लिटर ची सिंतेक्सची टाकी व त्यात कच्चे रसायन, सहा प्रत्येकी ३५ लिटर चे कॅन त्यात २१० लिटर  तयार दारु दिसुन आली.त्याच प्रमाणे आरोपींची सॅंट्रो कार जागीच मिळुन आली.

या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असुन जागीच दारुभट्टी व कच्चे रसायन नष्ट केले आहे. या कारवाईत उमेश भगत, कोकरे, शिंदे, अर्जुन शिंदे आदींनी सहभाग घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या