तळेगाव ढमढेरेत महावीर जयंती उत्साहात साजरी

Image may contain: 1 person, standing, crowd and outdoorतळेगाव ढमढेरे, ता. ३० मार्च २०१७ (जालिंदर आदक) : येथील जैन धर्मीय चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरात महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे जुन्या काळातील जैन धर्मीय चिंतामणी पार्श्वनाथाची मूर्ती असून आज महावीर जयंतीनिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर आकर्षक सजवलेल्या चांदीच्या पालखीतून महावीर स्वामींच्या मूर्तीची पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली.यावेळी ठिकठिकाणी  घरासमोर गवळी काढून खमासनी घालण्याची ही परंपरा अद्यापही सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

मुख्य बाजारपेठ,कारभारी चौक, कुंभार आळी अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जैन बांधव व महिला मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभाग झाले होते.या मिरवणुकीची सांगता जैन मंदिरासमोर झाली यावेळी महावीर स्वामींची मूर्ती पोखून मंदिरामध्ये घेतली गेली. महावीर जयंती नंतर परंपरेनुसार नऊ दिवस अंबिळची होळी चालते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या