'गुगल'च्या डुडलवर भारताच्या ड़ॉ.आनंदीबाई जोशी

मुंबई,ता.३१ मार्च २०१८(सतीश केदारी) : 'गुगल' ने भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डुडलवर आज(दि.३१) रोजी मानाचे स्थान दिले असल्याचे पहावयास मिळत आहे.आनंदीबाई जोशी यांची आज जयंती सर्वञ साजरी केली जाते.
जगप्रसिद्ध सर्ज इंजिन असलेल्या गुगल वर सातत्याने विविध डुडल पहावयास मिळत आहे.भारतात वैदयकिय क्षेञात महिलांचा प्रथम ठसा उमटविणा-या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जन्मदिवसानिमित्त आज गुगलच्या डुडलवर मानाचे दिले असुन या संदर्भातील त्यांचे एक चिञ प्रदर्शित केले जात  आहे.या चिञात गळ्यात स्टेथोस्कोप  व एका हातात वैद्यकिय पदवी घेतलेली दिसुन येत आहे.

आनंदीबाई जोशी यांच्याविषयी...
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्‍या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादीची शतपत्रे वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादीच्या शतपत्रांतून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.१८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पिटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या