याञेतील तमाशात होणारी हुल्लडबाजी झालीय डोकेदुखी

मांडवगण फराटा,ता.१ एप्रिल २०१८(राजेंद्र बहिरट) : पुणे जिल्ह्यात सध्या याञांचा हंगाम सुरु असुन या याञांच्या तमाशांच्या कार्यक्रमामध्ये काही गावांत होणारे वाद हि याञा कमिटी,तमाशा कलावंत अन पोलीसांची भलतीच डोकेदुखी ठरत असल्याचे चिञ अनुभवायला मिळत आहे.
मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैञ महिन्यात गुढीपाडव्याला होते. या दिवसांपासुन तमाशाची पंढरी समजली नारायणगाव(ता.आंबेगाव) येथे तमाशांच्या राहुट्यात तमाशांची बुकिंग जोरात सुरु केले जाते.या ठिकाणी बुकिंग अन तमाशांच्या सुपा-या घेतल्यानंतर गावोगावच्या याञांमध्ये तमाशा कलावंत रवाना होतात व त्यानंतर  तमाशाचा कार्यक्रम त्या-त्या गावांत केले जातात.परंतु जुन्या तसेच किरकोळ कारणांवरुन तमाशांच्या कार्यक्रमांमध्ये वादावादी होत असतात.त्यातच युवकांचा धांगडधिंगा पहायला मिळतो.यांमुळे तमाश्याच्या कार्यक्रमात व्यत्यय येउन कार्यक्रम बंदही पाडला जातो.तर अनेकदा यांत भांडणे होत असल्याने पोलीसांना मध्यस्थी करण्याची वेळ येते.तमाशाच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची सतत होणारी हुल्लडबाजी यांमुळेही तमाशा कलावंतांना नाहक ञास सहन करावा लागतो.गावा-गावातील जुने वाद, अंतर्गत वाद यामुळे तंटा होत असुन याञा कमिटीला हे तंटे मिटविताना नाकी नउ येत असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.हे वाद होत असल्याने पोलीसांनाही हे तंटे दिवसेंदिवस डोकेदुखी ठरु लागले आहेत.

या वादांमुळे ग्रामीण लोककला समजली जाणारे तमाशाच्या कार्यक्रमातील रंगबाजी, वगनाटये  या कला मागे पडत चालले असुन याला तरुणांच्या मुळे अॉर्केस्ट्राचे स्वरुप येउ लागले असुन अनेक वयस्कर बुजुर्ग मंडळी याबाबत खंत व्यक्त करु लागले आहेत.तरुन युवकांच्या तमाशांच्या धांगडधिंगा यामुळे याचा फटका तमाशा कलावंताना तर बसतोच परंतु वाद झाल्यास या युवकांच्या पालकांनाही पोलीस स्टेशनच्या वा-या करण्याची वेळ येते.यामुळे पालकांनाही मोठा घोर लागत आहे.वर्षातुन एकदा गावाकडे याञा साजरी केली जाते.त्यामुळे या याञांची सर्वांनाच उत्सुकता मोठ्या प्रमाणावर लागुन असते.या याञांमध्ये होणा-या वादांमुळे अनेकांच्या आनंदावर विरजन पडत आहे.याञेत युवकांनी धांगडधिंगा घातला तर काही ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा,तमाशे हे नाइलाजास्तव रद्द करावे लागतात.तमाशा कलावंतांना ठरलेली सुपारी हि द्यावीच लागते.तर गावक-यांच्या वर्गणीतुन गावच्या याञेसाठी खर्च करावे लागणारे पैसे अशा प्रकारे नाहक खर्च करावे लागतात.हा सगळा भुर्दंड अखेर सहन करावा लागतो तो सर्वसामान्य जनतेलाच.त्यामुळे याञा शांततेत पार पडली तर असा नाहक खर्च वाया जाणार नाही अन सर्वांना याञेचा मनमुरादपने आनंद घेता येउ शकतो.त्यामुळे याञेत युवकांनी दंगामस्ती न घालता  याञा शांततेत पार पाडण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडुन व्यक्त केली जात आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या