...अखेर मिलिंद एकबोटे शिरुर न्यायालयात हजर


Image may contain: 4 people, people standing and outdoorशिरुर,ता.४ एप्रिल २०१८(सतीश केदारी) : गेल्या अनेक दिवसांपासुन कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी चर्चेत असलेले मिलिंद एकबोटे यांना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले.

कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापुर पोलीस स्टेशनला विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.काही दिवसांपुर्वी त्यांना अॅट्रॉसिटीप्रकरणी अटकही करण्यात आली होती.

आज बुधवार(दि.४) रोजी शिरुर न्यायालयात त्यांना दुपारच्या सुमारास हजर करण्यात आले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मिलिंद एकबोटे यांचे वकिल अॅड.डॉ.चिंतामनी घाटे यांनी बोलताना सांगितले कि, एकबोटे यांच्यावर शिक्रापुर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असुन नुकतीच अटक करण्यात आली होती.आज शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मिलिंद एकबोटे यांच्यावर तीन महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल केलेला आहे असे सांगत एकबोटे यांचा या गुन्हयाशी संबंध नसल्याचे एकबोटे यांच्या वकिलांनी संकेतस्थळ www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.त्याचप्रमाणे या गुन्हयातील साधारण ८० आरोपींना जामीन मंजुर करण्यात आला असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली.अॅड.डॉ.चिंतामनी घाटे, अॅड.सुयोग वाघ,अॅड.सुहास ढमढेरे यांनी मिलिंद एकबोटे यांच्यावतीने काम पाहिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या