गुणवंत शिक्षकांचा अण्णापूर ग्रामस्थांकडुन सत्कार

Image may contain: 16 people, people smiling, people standing, crowd and outdoorअण्णापूर,ता.५ एप्रिल २०१८ (प्रा.ज्ञानेश पवार):  शिरूर तालुक्यातील जि.प. शाळा अण्णापूरच्या शिक्षिका प्रिया गणेश काळे, सोदकवस्ती शाळेच्या सुमन पठारे व पत्रा कुरंदळेवस्तीच्या शिक्षिका मनिषा श्रीकांत निचित  यांचा  गुणवंत शिक्षक  पूरस्काराबद्दल अण्णापूर ग्रामस्थ व पालक यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

प्रिया काळे या सध्या अण्णापूर येथिल प्राथमिक  शाळेत पदवीधर म्हणून  काम करत आहेत. त्यांनी या  ठिकाणी  विद्यार्थ्यांच्या बौद्धिक,शारिरीक व मानसिक विकासासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहे. मनिषा निचित यांनी पत्राकुरंदळेवस्ती येथे शाळेच्या सर्वांगीण प्रगती साठी त्यांनी बोलका वर्ग,वृक्षारोपण, शिक्षक आपल्या दारी, दोरीवरचे ग्रंथालय यासारखे विविध कार्यक्रम  राबवले आहेत.

सुमन पठारे यांनी सोदकवस्ती या शाळेत इंग्रजी पाठांतर, बोलक्या पताका यासारखे उपक्रम राबवले आहेत. मलठण व टाकळी हाजी केंद्रातील  उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून या सर्वांची ओळख आहे. याच कार्यक्रमात वंदना थोरात,शोभा तिकांडे,मंगल शिंदे यांनाही सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी अखिल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश थोरात, समितीचे सचिव नामदेव गायकवाड,शिक्षक पतसंस्थेचे सभापती कल्याण कोकाटे,बाळासाहेब खामकर,प्रविण गायकवाड, संजय थोरात, पांडुरंग नरवडे, पद्माकर काळे, दत्ता चोरे, शशिकांत बढे,भाऊसाहेब जाधव, दत्तात्रय गडदरे, बाळासाहेब डांगे, अण्णापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय कुरंदळे ,आमदाबादचे सरपंच योगेश थोरात,शाळा व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष दादाभाऊ कुरंदळे, गौतम कुरंदळे, शेखर कुरंदळे ,संजय कुरंदळे यांच्यासह मलठण व टाकळीहाजी केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक  उपस्थित  होते. या शिक्षकांचा त्यांना मिळालेल्या या पूरस्काराबद्दल अण्णापूर ग्रामस्थ व पालक यांच्यावतीने  पदवीधर प्राथमिक शिक्षक  व केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष  शहाजी पवार व गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोक पठारे तर आभार प्रदर्शन श्रीकांत निचित यांनी मानले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश पवार व अर्जुन निचित यांनी केले.या पुरस्काराबद्दल पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, अण्णापूरच्या सरपंच संगिता कुरंदळे,   उपसरपंच किरण झंजाड, रामलिंग उपसरपंच विठ्ठल  घावटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कुरंदळे ,पंचायत समितीचे माजी सदस्य दादा पाटील घावटे, कारभारी झंजाड,शालेय व्यवस्थापन समिती व पालक यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या