मंथन राज्यस्तरीय परीक्षेत ३२ मुली गुणवत्ता यादीत

Image may contain: 35 people, people smiling, people standingतळेगाव ढमढेरे,ता.५ एप्रिल २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : मंथन राज्यस्तरीय परीक्षेत तळेगाव ढमढेरे येथील जि. प. प्राथ. शाळा नंबर २ मधील ३२ विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकल्या असून त्यातील ४ विद्यार्थीनी राज्य गुणवत्ता यादीत चमकल्या आहेत.

विद्यालयाने उज्जल यशाची परंपरा कायम राखली असून यशस्वी विद्यार्थीनींचे सर्व पालक , ग्रामस्थ ,शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी अभिनंदन केले.

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे  : इयत्ता दुसरी : निर्मयी गोसावी (१८२), तनिष्का गायकवाड ( १७८), प्रणाली जेधे (१७६), तृप्ती चौधरी (१६८) ,वेदिका दरवडे (१६४) , सई ढमढेरे (१६४), नंदजा निम्मनवाड (१५४), श्रेया ओलेकर (१५०), कोमल डोके (१५०) , सिद्धी राऊत (१४८) , अक्षरा गायकवाड (१४६) ,कार्तिकी खामकर (१४६) ,गौरी ढमढेरे (१४६).
 इयत्ता तिसरी : समृद्धी ढमढेरे (२९४), सिद्धी डोके (२५६), भावना चव्हाण (२५२), शिवानी पवार (२२८), सिद्धी झुरंगे (२२२),सिद्धी लोनाग्रे (२४२), सानिका शित्रे (२२२),आर्या कुंभार (२४४). इयत्ता चौथी : वैष्णवी जेधे (२९२), वैभवी सातपुते(२८८),
स्नेहल केदारी (२८४), शौर्या ढमढेरे (२७६) ,आकांक्षा सायकर(२६६),साक्षी थोरात (२६२),धनश्री ओलेकर (२५२). इयत्ता पाचवी : प्रज्ञा क्षिरसागर (२८२), समृद्धी देव्हरकर (२६८) , अनन्या माने (२५४).

इयत्ता सहावी : प्रज्ञा चौधरी (२४०). सर्व यशस्वी  विद्यार्थिनींना  मुख्याध्यापिका  सबिया मोमीन, संगीता भालेराव, आशा सकट, सीमा गवारी, विजया चव्हाण आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या