करडेत भीषण अपघातात कर्नाटकातील जिल्हा सर्जनचा मृत्यू

Image may contain: one or more people, people standing and outdoorशिरुर,ता.६ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : शिर्डीला साईबाबा दर्शनाला जाणा-या कर्नाटक राज्यातील कोलार येथील एस.एन.आर(श्री.नरसिंह राजा) जिल्हा हॉस्पिटल च्या डॉक्टरांच्या गाडीला भिषण अपघात होउन जिल्हा हॉस्पिटल चे सर्जन डॉ.शिवकुमार यांचा जागीच मृत्यु झाला.तर यात गाडीचा चालक गंभीर तर इतर सहाजण हे जखमी झाले आहेत.

या अपघातप्रकरणी विजयकला बाळाजी(वय.३१, रा. उदयगिरीनगर कोलार, ता. जि. कोल्हार, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. शिवकुमार(वय.५३) यांचा मृत्यु झाला आहे.
Image may contain: 1 person, closeupशिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस.एन.आर जिल्हा हॉस्पिटल,कोलार येथील हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व स्टाफ नर्स यांचे काम चांगले असल्याने सर्वांनी मिळुन शिर्डी साईबाबा येथे ट्रिप काढली होती.त्याप्रमाणे एकुण १५ लोकांनी इनोव्हा कार नं (के .ए ०३ ए.ए ३४६७) व इरटिका या गाड्यांमधुन कोलार कर्नाटक येथुन शिर्डी येथे जाणेकरिता गुरुवार(दि.५) रोजी निघाले होते.डॉ.शिवकुमार यांच्या गाडीवर किरण प्रसाद हा चालक होता.

कर्नाटक येथुन डॉक्टर व सर्व स्टाफ निघाल्यानंतर चौफुला शिरुर रस्त्याने करडे येत असताना समोरुन एक मोटारसायकल स्वार आल्याने इनोव्हा कार चालकाने मोटारसायकलस्वारास साईड देण्याकरिता गाडी बाजुला घेत असताना रोडच्या कडेला झाडास धडकुन अपघात झाला.

या अपघातात सर्व ७ प्रवासी जखमी झाले असुन इनोव्हा कार चालक किरण प्रसाद याच्या डोक्यास मार लागला.तर जिल्हा सर्जन डॉ.शिवकुमार यांच्या डोक्यास मार लागुन ते अपघातात ठार झाले.त्याचप्रमाणे यातील स्टाफ नर्स दिपा हिच्या हातास मार लागुन डावा हात फ्रॅक्चर तसेच स्टाफ  नर्स कांचन हिच्या डाव्या पायास मार लागुन डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे व इतर प्रवासी जखमी झाले आहेत.अपघात झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी जखमींना तातडीने मदत करत शिरुरच्या दवाखान्यात दाखल करण्यास मदत केली.

या प्रकरणी पोलीसांनी फिर्यादीनुसार इनोव्हा कार चालक किरण प्रसाद यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताचे वृत्त कळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या