ललिता देवरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

Image may contain: 5 people, people standingकरडे, ता. ७ एप्रिल २०१८ (प्रा. ज्ञानेश पवार) :  करडे गावच्या ललिता देवरे यांना पंचायत समितीचा गुणवंत शिक्षक  पुरस्कार नुकताच शिरूर तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

ललिता देवरे या सध्या  तळवाडी (करडे)येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी रायगड जिल्हयात उल्लेखनीय  सेवा केली आहे. तळवाडी शाळेत सन२०१२ व २०१५ मध्ये  त्यांचे  २ विद्यार्थी  शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यांच्या  विद्यार्थ्यांनी मंथन,परीघ,सेट्रल या परीक्षांमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. लोक सहभागातून अनेक शैक्षणिक सुविधा त्यांनी शाळेस मिळवून दिल्या आहेत.शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्या विविध उपक्रम राबवत आहेत. कारेगाव केद्रांतील एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबददल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील,पं स.सदस्य विश्वासआबा कोहकडे,राणीताई शेंडगे, गटविकास अधिकारी संदिप जठार, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष शहाजी पवार,जिल्हाध्यक्ष अनिल पलांडे, विभागीय  अध्यक्ष  सोपानआबा धुमाळ, दिव्यांग संघटनेचे  अध्यक्ष सतिश पाचर्णे,करडे गावच्या सरपंच रुपाली वाळके,उपसरपच गणेश रोडे,पंचायत समितीच्या माजी उपसभापती मंगल लंघे, माजी आदर्श सरपंच संतोष लंघे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश बांदल, विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब वाळके, व्हाईस चेअरमन मधुकर बांदल, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पळस्कर, संतोष घायतडक व अनेक पालक यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या