रांजणगाव देवस्थानच्या वतीने बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा

No automatic alt text available.
रांजणगाव गणपती
, ता. ७ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) :
रांजणगाव देवस्थान च्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती देवस्थान चे अध्यक्ष डॉ. संतोष रामा दुंडे यांनी दिली.

डॉ. दुंडे याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि,पुणे जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह समिती व रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने बुधवार (दि.९ मे) रोजी सर्वधर्मिय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन हा सोहळा सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.या विवाह सोहळ्यात देवस्थान च्या वतीने सर्व सुविधा पुरविल्या जाणार असुन इच्छुकांनी वधु वरांच्या जन्मदाखल्यासह नाव नोंदणी करण्यासाठी देवस्थान शी संपर्क साधावा.

अधिक माहिती साठी ०२१३८-२४३२०१, ९२०९२०२२२२ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. दुंडे यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या