'त्या' जिगरबाज पोलीस कर्मचा-याची तालुकाभर चर्चा

Image may contain: 1 person, text and closeupकारेगाव, ता. ७ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : पाण्यात बुडणा-या मुलाला वाचविण्यासाठी खाकी वर्दीसह पाण्यात उडी घेउन जीव वाचविणा-या रांजणगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यावर तालुकाभर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नऊ फूट खोल घाण पाण्याच्या डबक्‍यात पडलेल्या सातवर्षीय मुलाला वाचवणा-या जीव पणाला लावलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव रघुनाथ भीमराव हाळणोर असे असुन ते रांजणगाव पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत.तर त्यांनी  चैतन्य जोरी (वय 7) असे जीवदान दिलेल्या मुलाचे नाव आहे.

मंगळवारी (ता.3) दुपारी दोनच्या सुमारास चैतन्य हा इतर दोन मित्रांसमवेत डबक्‍यातील मासे पकडण्यासाठी गेला होता. या वेळी पाय घसरून तो डबक्‍यात पडला. दोघा मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरडा केला, पण जवळपास कुणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही. त्यानंतर चैतन्याच्या सोबत असलेल्या दोघा मुलांनी  जवळच असलेल्या रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे धाव घेत उपस्थित पोलीसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी हाळणोर यांनी क्षणाचाही विलंब न लावता  स्वतःच्या दुचाकीवरून त्या दोन्ही मुलांना घेऊन घटनास्थळ गाठले व चैतन्यला डबक्याबाहेर काढून जीवदान दिले.

त्यांच्या याच धाडसाचे अन समयसुचतेचे तालुक्यात मोठे कौतुक होत असुन शिरुर तालुक्यात या कर्मचा-याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या